
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर मध्ये काही सरकारी व खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही रुग्णांना सिटीस्कॅन साठी नांदेड येथे रुग्णालयात पाठवण्यात येते. परंतु नांदेड येथील सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी असल्यामुळे नंबर लवकर लागत नाही नाईलाजाने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते खाजगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे रुग्णांकडून ३६०० रुपये घेतले जात आहेत.
गरिब रुग्णांना हे परवडणारे नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा मानसिक व आर्थिक मनःस्ताप होत आहे. ही बाब लक्षात घेऊन देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या सिटीस्कॅन मशीन साठी तगादा लावून ठेवला होता .शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि देगलूर येथे सिटीस्कॅन मशीन काही दिवसापूर्वी आली पण आज ती मशीन काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी देगलूर येथून मुखेडला ही मशीन नेण्यासाठी त्या मशीन कंपनीचे ऑपरेटर इंजिनियर व कंपनीचे मॅनेजर देगलूर येथे उपजिल्हा रुग्णालयातून मशीन नेत असताना देगलूर येथील काही राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना समजलं लगेच कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून ती मशीन तिथून हलवण्यास मनाई करून त्या अधिकाऱ्यांना जाब विचारना केली व तुमच्याकडे अशी कोणता आदेश आहे का मशीन देगलूर इथून मुखेड ला नेण्यात यावी पण त्या कंपनी मॅनेजर व कॉन्टॅक्टर यांनी उडवा उडवीची उत्तर दिले त्यावेळी देगलूर येथील सर्व कार्यकर्त्यांनी मशीन इथून हालवून देणार नाही असे त्यांना खडे बोल केल्यानंतर शेवटी त्यांनी बाहेर काढलेली सिटीस्कॅन मशीन पुन्हा जेसीबीच्या साह्याने दवाखान्या मध्ये ठेवण्यात आली.पन प्रश्न असा निर्माण होतो की देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाहेरले कुठलेही व्यक्ती येऊन गेट पास न घेता एवढी मोठी मशीन घेऊन जात आहे पण त्यांना विचारणारा देगलूर उपजिल्हा रुग्णालय मध्ये कोणताच अधिकारी तेथे उपस्थित नव्हता यावर असे लक्षात येते की देगलूर उपजिल्हा रुग्णालय हा रामभरोसे चालतो का? . यासाठी शासनाने अशा गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष घालून देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली सुविधा कशी देण्यात येईल याकडे बघितले पाहिजे.