
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
लातूर / भवानवाडी :- भवानवाडी सिरुर ताजबंद येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना अहमदपूर विभाग १ प्रकल्पांतर्गत आंगनवाडी क्रमांक १ भवानवाडी येथे ८ मार्च २०२३ रोजी सकाळी जागतिक महिला दिनानिमित्त आंगनवाडी कार्यकर्ती कु. वळसणे कालिंदा रामकिशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर येथील प्रकल्पांतर्गत सुपरवायझर शोभा घोडके मॅडम हे उपस्थितीत होत्या. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सार्वजनिक जीवनात महिलांनी केलेली प्रगती,विकास व योगदान यांबद्दल माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास गावातील सर्व महिलांचा समावेश होता. महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य आहार व विहार तसेच घ्यावयाची काळजी यांबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर महिलांचे वटीभरण हा कार्यक्रम घेण्यात आला आणि गरोदर माता सौ.सोनाली नागनाथ जगदाळे यांचे वटीभरण करण्यात आले आणि गरोदरपणात मातेकडून कशाप्रकारे काळजी घ्यावी यांबद्दल माहिती देण्यात आली. हा आदर्श कार्यक्रम यशस्वी करण्यात सविता चामे,पार्वती चामे,पद्ममीन, अम्रता चामे, कांताबाई वळसणे, कौशल्या जगदाळे,वंदना जगदाळे, शितल येणगे, उषाताई गुरमे, क्रांती मॅडम गुडसुरकर आदी गावातील नागरिक व मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता.