
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) : सध्या आर्वी विधानसभा क्षेत्रात गल्लीबोळात आणि निर्मनुष्य ठिकाणी होर्डिंग स्पर्धा असल्यागत ठीक ठिकाणी नवख्या कार्यकर्त्यांची पोस्टर्स पाहायला मिळतात यात आष्टी तालुका आघाडीवर असल्याचे चित्र सामान्य नागरिकासमोर निर्माण केल्या जात आहे अशातच आर्वी विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून कारंजा (घा) तालुक्यातील जय बेलखेडे यांच्याशी आष्टी बसस्टॉप लगतच्या एम.एच.३२ या पान टपरीवर अचानक जय बेलखेडे यांची झालेली भेट अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेली
प्रश्न:(पत्रकार) दादा तुमच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर स्थानिक आ.केचे यांचा फोटो न लावता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाच फोटो का?
उत्तर: (जय बेलखेडे) मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून एक सामान्य जनतेचा कार्यकर्ता आहो मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचं कुशल नेतृत्व आणि आमचे आप्त स्वकीय असल्यामुळे होर्डिंगवर बावनकुळे यांचा फोटो आहे
प्रश्न(पत्रकार): तुम्ही म्हणता मी कोणत्याच पक्षाचा नाही?मात्र तुमच्या अर्धांगिनी हर्षलताताई बेलखेडे या तर भाजपच्या पदाधिकारी आहे ? त्याच काय ?
उत्तर(जय बेलखेडे): प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्या भाजपाच्या पदाधिकारी आहेत मी मात्र कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थन करत नाही फक्त एक सामान्य कार्यकर्ता आहे
प्रश्न(पत्रकार): दादा आष्टी शहराबद्दल काय सांगाल?
उत्तर(जय बेलखेडे): आष्टी शहरातील सर्व धर्मीय समता, एकात्मता हा एक संवेदनशील शहरासाठी आदर्श आहे
प्रश्न(पत्रकार): दादा तुमची सामान्य नागरिकांसाठी काय ब्ल्यू प्रिंट आहे
उत्तर(जय बेलखेडे): गावातील किंवा शहरातील शेवटचा घटक सुखी, समाधानी आणि निर्भीडपणे जगला पाहिजे तो सामाजिक,शैक्षणिक आरोग्यदृष्ट्या अश्या विविध आघाड्यावर विकसित झाला पाहिजे यासाठी मी सदैव तयार असल्याचे उत्तरा दाखल सांगितले तितक्यात रशीदभाई या कार्यकर्त्यांने मोठ्या आवाजात एक आवाज देत विकासासाठी पक्षपात विसरून जय दादा यांचे सोबत लोकांनी जुळण्याची आवश्यकता व्यक्त केली यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती