
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात १४ मार्च २३ पासून कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव यांच्याशी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात करण्यात येवून मागण्या संदर्भात शासन स्तरावर सकारात्मक चर्चा घेण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचारी संवर्ग कर्मचारी यांचा संप मागे घेवून संघटनेचे कर्मचारी पूर्ववत कामावर हजर झालेले आहे असे प्रमुख मार्गदर्शक वर्धा जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे, जिल्हा महासचिव वरुण पंड्या, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश जळीत आर्वी तालुकाध्यक्ष साकेत राऊत यांच्या सहीनिशी आर्वी न.पं. मुख्याधिकारी यांना १६ मार्च रोजी जा.क्र ११३/२३ ला निवेदन देवून संपातून माघार घेतली आहे