
दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे केरूर या गावात संपन्न होत आहे . तरुणाईला योग्य दिशा मिळाली पाहिजे . युवकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आवश्यक आहेत. याठिकाणी युवकांचा सळसळता उत्साह अनुभव घेता येतो असे विचार उद्घाटन प्रसंगी उद्घाटक सुप्रसिद्ध कवी श्रीगण रेड्डी यांनी प्रतिपादित केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरभद्र शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , उद्घाटक म्हणून महाराष्ट्र – कर्नाटकातील सुप्रसिद्ध कवी श्रीगण रेड्डी , प्रमुख पाहुणे प्र.प्राचार्य प्रा.सी.बी.साखरे , केरूरचे सरपंच सौ.शिवकांता गणेशराव पाटील , शालेय समिती अध्यक्ष यशवंत पाटील नरवाडे , तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर पठाडे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , बाबुराव पा.शिंदे हे उपस्थित होते . प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी व क्षेत्रिय समन्वयक प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. भारत केंद्रे यांनी केले .
महात्मा ज्योतिबा फुले व गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना पळसाच्या फुलांचे गुच्छ , शाल , ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला . उद्घाटक श्रीगण रेड्डी यांच्या काव्यात्मक प्रबोधनातून ” हास्यातून काव्य फुललंय ” या कार्यक्रमाच्या 324 वा प्रयोग यशस्वीपणे सादरीकरण केले . तरुणाईचा उत्साह कायम ठेवत आई – वडीलांचे दुःख , प्रेम , जिव्हाळा , सामाजिक जबाबदारी , हक्क , अधिकार , कर्तव्य , समता इत्यादी विषयावर प्रकाश टाकला . प्र.प्राचार्य प्रा.साखरे यांनी युवकांना दिशाभूल करणाऱ्या क्षणिक गोष्टींचा त्याग करण्याचा , राष्ट्रीय सेवा करीत असताना सामाजिक समतोल राखण्याचा , भाषा , भाव – भावनेचा आदर करत मनमुराद आनंद घेण्याचा , विशेष वार्षिक युवक शिबीरातून स्वतःला व समाजाला नवचैतन्य देण्याविषयी मोलाचा सल्ला दिले .
अध्यक्षीय भाषणातून कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले . अध्यात्म व विज्ञान समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या संधी , जबाबदारी देत असतात . ज्या माणसाला या दोन्ही गोष्टी लक्षात आले तर तो जीवनात यशस्वी होतो . महाविद्यालयाच्या नियोजनबद्ध आखणीतून मागील 50 वर्षाचा यशस्वी टप्पा गाठला आहे . भविष्यात देखील परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे . राष्ट्रीय सेवा योजना विभागातून खुप खुप आनंद घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गिरीधर शिंदे , दिनेश गायकवाड , हणमंत शिंदे , सतीश शिंदे , किरण शिंदे , गजानन शिंदे , दत्तात्रय कदम इत्यादी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे . यावेळी असंख्य स्वयंसेवक , स्वयंसेविका , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .