
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे ५ मार्च रोजी सावता सावित्री वधू वर संस्थेतर्फे मेळावा पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये भव्य राज्यस्तरीय सर्व शाकीय माळी समाज महामेळावा भव्य दिव्य दिमाखात पार पडला मेळाव्यात मुंबई नागपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा कोकण यवतमाळ पुणे इत्यादी भागातील वधू-वरांची नोंदणी झाली होती आणि सर्व स्तरातून वधू-वरांनी उपस्थिती दाखवली व मेळाव्यातील प्रत्यक्ष मुलाखत देऊन बरेचसे लग्न जमले हा फार मोठा सामाजिक उपक्रम संस्थेने राबवला त्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीच्या लेकी पुरस्कार विविध क्षेत्रातील पारंगत सामाजिक महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चंद्रपूर येथून अरुण तिखे, प्रसिद्ध उद्योजक प्रशांत दादा डोके, वाघोले ग्रुप ऑफ इंडस्ट्रियल चे सर्वेसर्वा नामदेव वाघोले, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे आणि हनुमंत माळी माजी महापौर अपर्णाताई डोके आणि इतर मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वाघोले अध्यक्ष मारुती भुजबळ महासचिव ,सुरेश गायकवाड सचिव ,प्रकाश गडवे कार्याध्यक्ष ,कैलास भुजबळ संचालक, गोविंदराव आल्हाट, प्रदीप शिंदे, संतोष सोनटक्के, प्रशांत जगताप ,बाळासाहेब भुजबळ यांच्या सहकार्याने हा मेळावा अगदी भव्य दिव्य स्वरूपात पार पडला.