
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड दि. तहसील कार्यालयाच्या आवारात विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी संप पुकारून आंदोलन करीत असल्याचे दिसून येते आहे असेच आंदोलन आज मुखेड तहसील कार्यालयाच्या आवारात विविध कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यात शिक्षक संघटना आरोग्य विभाग संघटना ग्रामसेवक संघटना, तहसील व पंचायत समिती सर्व कर्मचारी संघटना ग्रामसेवक संघटना अशा विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेतला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत , जुन्या पेंशन योजनेची अंमलबजावणी करावी . या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध अधिकारी कर्मचारी संघटना आज दि . 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात आहेत . या संपास मुखेड तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचा समावेश असलेल्या ” शिक्षक संघटना समन्वय समितीचे खालील पदाधिकारी व शिक्षक सहभागी होत आहेत . लागू करणेसाठी राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक संघटना, आरोग्य विभाग, शिक्षक संघटना, महसूल विभाग, सर्व विविध कर्मचारी संघटना यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. तसेच शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदेड जिल्हा समन्वयक दशरथरावजी लोहबंदे साहेब व उपस्थित शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, शिवाजी गेडेवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.