
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
इकरा इस्लामीक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन घनसार हॉल येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.विविध गीतांवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य साजरे करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जमातूल मुस्लिम म्हसळा अध्यक्ष नाजीम चोगले ,प्रमुख पाहुणे माजी सरपंच रफिक चनेकर, वफा काजी,सन्माननीय अतिथी सलीम उकये, शुहैब घराडे, अब्दुल शकूर घनसार, मुनीर जमादार, फैसल गीते, शाहिद उकये, डॉ मोईज शेख, डॉ नसीम खान, डॉ ए के जलाल, नफिस शाहपुरी सर, मोहम्मद अली फौजदार , नगरसेविका राखी करंबे, सुमय्या अमदानी, नौशिन चोगले, फरहीन बशारत, नगरसेवक सुफीयान हळदे उपस्थीत होते. नाजीम चौगले, डॉ मोईज शेख आणी रफिक चनेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हाफिज चौधरी, मोहसिना काजी, हुमेरा काजी, इकरा घरटकर, रुशिका पांचाळ, नासिर फौजदार यांनी मेहनत घेतली.