
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज :- १५मार्च पासून या भागांमध्ये ढगाळ वातावरण जाणवले आहे .मात्र आज १८ मार्च सायंकाळी ६ वाजता विजेच्या कडकडासह पेठवडज कल्हळी शिरशी गोणार येलुर मसालगा, कळका,मंगनाळी राहटी, वरवंट व परिसरातील इतर गावांमध्ये दमदार पावसाची सुरुवात झाली .अर्धा तास दमदार पाऊस पडल्यामुळे
शेतकऱ्याची तारांबळ उडाली अनेक शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, ज्वारी, जनावराचे वैरण, आंबा,फळबागा व इतर रब्बी पिकांचे या पावसामुळे बरेचसे नुकसान झाले आहे.. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा ,ज्वारी कापणी करून त्यावर ताटपत्री झाकण्यात आले होते परंतु सोसाट्याचा वारा असल्यामुळे हे देखील पावसाने भिजून नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस आणखी किती मोठा पडेल गारा किती पडतील अशी भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाले आहे.सरकारने पंचनामे न करता डायरेक्ट बॅक खात्यात पैसे पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकरी बांधवाची आशा आहे.