दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील विविध सनांच्या, देवी, देवतांच्या उत्सवाच्या राष्ट्रसंत, महामानव, महापुरुषांच्या मिरवणूकी मध्ये मद्यपान करुन सहभागी होणा-यावर कायदेशीर कार्यवाही करावी असे साईगर्जना ढोल ताशा पथक देगलूर यांच्यातर्फे आज देगलूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन विनंती करण्यात आली .
देगलूर शहरातील विविध सनांच्या देवी देवतांच्या उत्सवाच्या राष्ट्रसंत, महामानव, महापुरुषांच्या मिरवणूकी मध्ये मद्यपान करुन सहभागी होत असतात त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे अशा लोकांना पायबंद करणे आवश्यक आहे.
तरी मिरवणूकी मध्ये मद्यपान करुन सहभागी होणा-यावर कायदेशीर कार्यवाही करुन कायदा सुव्यवस्था बाधीत ठेवावी अशी विनंती देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे याना करण्यात आली. त्यावेळी दिगंबर कौरवार . श्रीनिवास मोरे.
किरण उल्लेवार
गणेश मैलागीरे. अविनाश अनमुलवार.
विष्णुकांत पाटील
अनिकत अनमुलवार
नागश अनमुलवार आधी कार्यकर्ते उपस्थित होते
