दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
चाकूर माहेश्वरी सभा च्या चाकुर तालुकाध्यक्षपदी गोविंदलाल लोया तर सचिवपदी बजरंग बांगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
येथिल श्री बालाजी राम मंदिर चाकूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी सभा च्या जिल्हा सचिव,फुलचंदजी काबरा हे होते तर निवडणूक अधिकारी सुरेशचंद्र मालु, सहाय्यक अधिकारी,गोकुळ चांडक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये माहेश्वरी सभा च्या तालुकाध्यक्षपदी गोविंद लोया तर सचिव पदी बजरंग बांगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली,पुढील कार्यकारणी खालील प्रमाणे घोषित करण्यात आली, कोषाध्यक्षपदी,जगदीश राठी, संघटनमंत्री,दयानंद हरकुट, सदस्य पदी लक्ष्मीकांत राठी, श्रीनिवास लोया, श्रीराम बांगड, यांची निवड करण्यात आली तर जिल्हा कार्यकारणी व ओमप्रकाश लोया यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी,मेघराज बाहेती,गोविंदलाल हरकुट,गोवर्धनदास राठी,आनंद लोया, आदींची उपस्थिती होती,या निवडीबद्दल सर्व समाज बांधवातून अभिनंदन होत आहे.
