
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनीधी-विष्णु मोहन पोले.
लातूर/अहमद्पुर: तालुक्यातील सुमठाणा येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत बाळू मामा देवस्थान अखंड हरीनाम सप्ताह च आयोजन करण्यात आले होते.दि. 14मार्च रोजी पासून हरीनाम सप्ताह सुरु झाला .पंचक्रोशीतील नावाजलेले कीर्तनकार ह.भ.प.सुभाष महाराज पोले सुमठाणकर आणी मच्छिन्द्र महाराज सांगवीकर यांच्या सुमधुर ,भक्ती पूर्ण कीर्तनाने सप्ताहाचि सुरुवात झाली त्यानंतर दरदिवशी नावाजलेल्या महाराजांची कीर्तनरूपी सेवा या गावाला झाली त्या मध्ये ह.भ.प दीपक महाराज शेवरेकर, ह.भ.प.शंकर महाराज लोंढे,हभप पुरुषोत्तम महाराज पोखर्णी,ह.भ.प.राम महाराज खोरसकर,आदी ज्ञान सम्राट,महाराजांची कीर्तन सेवा झाली. गावातील पुरुष ,लहान थोर,महिला आदिनी आपल्या बाळू मामाच्या भक्तीत आणी हरीनामाच्या गजरात स्वतःला पूर्णपणे समर्पित केल होत.पहाटे सुमधुर हरीनामाचा गजर पहाटे काकडा आरती प्रमुख धोंडीराम महाराज सुमठाणकर आणी त्यांचं भजनी मंडळ भक्त गणांना मनमुग्ध करत होते तर सकाळी 6ते 9 ज्ञानेश्वरी पारायण,10ते12तुकाराम गाथा भजन,2ते3भावार्थ रामायण,रात्री हरिपाठ, हरी कीर्तन ,हरिजागर हे दररोज होत असे दि.18रोजि प्रख्यात प्रवचनकार ,ज्यांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं या सुप्रसिद्ध मालिकेत अभिनय केला आणी त्यातून प्रेरित होऊन बाळू मामा आणी त्यांचं चरीत्र आपल्या प्रवचनातून सांगणारे मेजर विक्रम सूर्यकांत जगताप यांनी येऊन सर्व बाळू मामा भक्तांना आपल्या वाणीने ,प्रवचनाने आणखी ज्ञानात आणी भक्तीरसात तल्लीन केले .दि.19रोजि अखंड हरीनाम सप्ताहाचि सांगता ह.भ.प.राम महाराज खोरसकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.कान्हाच्या लहानपणीच्या खोड्या,गवळणीची छेड,तितकंच गवळणीच गोपाल वर असलेलं निरागस,भक्तिमय प्रेम आणी भक्ती हे महाराजांच्या कीर्तनातून समजून आले.बाळू मामाची भक्ती,आध्यत्मिक कार्यक्रम,त्यातून समाज प्रबोधन ,या सर्वच गोष्टी बाळू मामादेवस्थानाच्या अखंड हरीनाम करण्याच्या हेतू मध्ये होत्या.गावातील सर्वच लोकांचा सहभाग या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य .गावातील तरुण भजन,कीर्तन या बरोबरच गावातील सर्व अन्न दानाच्या पंगती वाढणे,त्याच योग्य व्यवस्थापन करणे,लाईट,डेकोरेशन पासून ते गावात इतर गावातील आलेली भजनी मंडळ,भजनी,यांची योग्य पाहुणचार,व्यवस्था करण्याचं काम येथील बाळू देवस्थानाचे वडील धारी मंडळी,आणी युवक योग्य पद्धततीने हाताळतात ही त्यांची कौतुकास्पद गोस्ट आहे.या सप्ताह मध्ये गावापासून दूर आपल्या व्यवसायनिमित्त ,शिक्षणासाठी ,नोकरीसाठी बाहेर गावी असलेली सर्व मंडळी या सप्ताह कार्यक्रमांसाठी एकत्र जमतात.भक्ती मार्ग आणी प्रमेश्वराची श्रद्धा पूर्ण गावाला एकत्र अनन्याचं काम या सप्ताह निमित्त करते आज त्याच सप्ताह अखंड हरीनामाचि सांगता झाली.पण प्रत्येक भक्ताच्या मनात असलेलं देवाच भक्तीरूप कायम राहील.