
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- अहमदपूर तालुक्यातील उजना ते गंगाहिप्परगा पुढे राणीसावरगाव गंगाखेड या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनधारकांना अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्त्वाच्या रस्ता दुरुस्ती कडे लक्ष देईल का अशी भावना जनमानसात दिसून येत आहेत.
उजना ते गंगाहिप्परगा हे अंतर साधारणता तीन किलोमीटरचे असून यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यात खड्डा का
खड्ड्यात रस्ता असा प्रश्न या रस्त्यावरून जाताना समोर येतो विशेषता सदरील रस्त्यावरूनच सिद्धी शुगर या साखर कारखान्याकडे जावे लागते या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे शेतकरी आणि वाहनधारक यांचे मोठे नुकसान झालेले आहे अशी सर्व गंभीर परिस्थिती असताना सुद्धा या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे सदरील रस्ता तातडीने दुरुस्त करून द्यावा अन्यथा नाईलाजाने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल अशा पद्धतीची जनभाव जनमानसात भावना निर्माण झालेली आहे.