
दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
कंधार/वरवंट :-कंधार तालुक्यातील मोजे वरवंट येथील दिनांक १७/३/२०२३या दिवशी अवकाळी पावसामुळे गारपीट झाली यांचा सर्वे करण्यासाठी वरवंटचे तलाठी एस एन हनुमंते, वरवंटचे ग्रामसेवक एच एस डावकोरे ,वरवंटचे कृषी सहाय्यक जी ए तोटेवाड यांनी गहू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, व भाजीपाला, अवकाळी पावसामुळे व गारपीट झालेल्या सर्व गावच्या शेतकऱ्यांचे शेतातील सर्व पिकाचे सर्वे (पंचनामे)करण्यात आले. वरवंट चे सरपंच सुशीलाबाई सोपान सोनकांबळे, उपसरपंच सुनिता अप्पाराव वडजे, व त्यांचे प्रतिनिधी अप्पाराव गंगाधर वडजे, सोपान गोविंद सोनकांबळे, आनंदा भीमराव धोपटे, उद्धव रघुनाथ निलेवाड, संग्राम नागोबा निलेवाड, नरसिंग निवृत्ती निलेवाड, मनमोहन आनंदागिरी, जयप्रकाश सुधाकर आस्टुरे, दिगंबर जळबा डाके, व समस्त गावचे सर्व शेतकरी मंडळी यांचा सर्वे(पंचनामा) करण्यात आला.