
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा- सर्व शिक्षक व शिक्षण विभाग पंचायत समिती लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद भंडारा यांचा कृतज्ञता गौरव सोहळा, निरोप समारंभ दि.२७मार्च सोमवारी विकी गार्डन मंगल कार्यालय लोहा येथे सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. रवींद्र सोनटक्के पंचायत समिती लोहा येथे गटशिक्षणाधिकारी पदावर तीन वर्षे कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया खंडित होऊ न देता वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे शिक्षण निरंतर चालू ठेवले आहे .तसेच गरजूंना पालकांना शिक्षकांच्या मदतीने ८५० अन्नधान्य किटचे लोहा तालुक्यात वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केले आहे. सध्या ते पदोन्नतीने जिल्हा परिषद भंडारा येथे शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत .त्यांच्या या समाज उपयोगी शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता गौरव सोहळा अर्थात निरोप समारंभ कार्यक्रमास विशेष अतिथी अभिजीत राऊत (भा.प्र.से )जिल्हाधिकारी नांदेड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उद्धव भोसले कुलगुरू स्वा.रा.ती.म.वि. नांदेड, प्रमुख मार्गदर्शक वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद नांदेड, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती शरद मंडलिक उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी , शिवाजी कपाळे पूर्व अ. मु. का.अ., व्यंकटेश मुंडे तहसीलदार लोहा, डॉ.सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी( मा.),सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्रा.), जयश्री आठवले प्राचार्य डायट नांदेड ,दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी,अवधूत गंजेवार उपशिक्षणाधिकारी, बंडू आमदुरकर उपशिक्षणाधिकारी शैलेश वाव्हळे गटविकास अधिकारी , संजय भोसीकर नायब तहसीलदार, अशोक मोकले नायब तहसीलदार ,राम बोरगावकर नायब तहसीलदार ,गंगाधर पेंटे मुख्याधिकारी न.प., प्रणव चेटलावार प्रकल्प अधिकारी ए.बा.,सतीश गुजलवार ता. आरोग्य अधिकारी ,संतोष तांबे पोलीस निरीक्षक,चंद्रकांत धुमाळे अधिव्याख्याता तथा लोहा संपर्क अधिकारी, सतीश व्यवहारे गटशिक्षणाधिकारी लोहा यांची उपस्थिती लाभणार आहे. तालुक्यातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकासाठी गुणवत्ता विकास कार्यशाळा आयोजित केली आहे .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघटनेच्यावतीने बाबुराव फसमले,जी.एस.मंगनाळे, अशोक पाटील, मदन नायके ,ज्ञानोबा घोडके,रमेश पवार, राजु पाटील, संतोष अंबुलगेकर , मल्लिकार्जुन जोडराणे,आर.जी.वाघमारे,जे.जी.कांबळे, पाराजी पोले, बी.वाय.चव्हाण, अशोक मोरे, मंगल सोनकांबळे,संतोष साखरे, संजय अकोले,बाळु चव्हाण, गजानन उप्परवाड, विठ्ठल चव्हाण, आदी शिक्षक परिश्रम घेत आहेत.