
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत देगलूरचे जलतरणपटू रामचंद्र उल्लेवार यांनी ३ प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी बजावत ३ पदके प्राप्त केली आहेत.
नाशिक येथील वीर सावरकर जलतरणीकेत मास्टर्स क्रीडा असोसिएशन उत्तर प्रदेशच्या वतीने पाचव्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेचे १८ १९ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातील अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या जलतरण स्पर्धेत देगलूरचे जलतरणपटू रामचंद्र उल्लेवार यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये १ पदक. ४००आहे. रामचंद्र उल्लेवार यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आ. जितेश अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, प्रशासक तथा मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, डॉ. मुंडे, डॉ. भूमे, डॉ. इंगोले, अविनाश निलमवार, मुख्याध्यापक यादव बतकुलवार, आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास मैलागीरे, शंकर रोयलावार, अब्दुल जब्बार, संतोष देशमुख, सुभाष कलेटवार, माधव संगमकर हनमंतराव मोघे शेषराव मोघे शिवराज चेडके आदी जलतरणपटू ने अभिनंदनचा वर्षाव केला