
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
आज शनिवार दि.२५ मार्च रोजी सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय भोकर व तालुक्यातील कामनगाव या दोन ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भोकर तहसील कार्यालय येथे होत असलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून या शिबिरास महंत उत्तम बन महाराज भोकर तहसीलचे तहसीलदार राजेश लांडगे उमरी पंचायत समितीचे सभापती गिरीश देशमुख गोरठेकर भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.
सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीचा मराठवाडा स्तरीय सेवा समर्पण पुरस्कार पाली जिल्हा बीड येथील एच आय व्ही ग्रस्तांचे संगोपन करणारे तथा समाजसेवक इन्फंट इंडिया चे श्री.व.सौ .संध्याताई दत्ता बारगजे या दोघांनाही देण्यात येणार आहे. याच बरोबर सेवा समर्पण साहित्यिक पुरस्कार परभणी येथील जेष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांना देण्यात येत आसल्याची घोषणा सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी केली असुन या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानपत्र, या सह रोख रूपये ११ हजार असुन हा सोहळा दि. २ एप्रिल रोजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय येथे होणार आहे.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, डॉ. श्रीपाल सबनीस, माजी. मंत्री डॉ. माधवराव पा. किन्हाळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या पुर्वी आज होत असलेल्या महारक्तदान शिबिरास भोकर व परिसरातील जास्तीतजास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून रक्तदान करून आपले अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी पत्रकार परिषदे द्वारे केले आहे.