
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील ईटकुर येथे कर्ण फाउंडेशन च्या वतीने मोफत डोळे व दात तपासणी शिबिर23 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मोफत डोळे व दात तपासणी करण्यात आली .यामध्ये गावातील 287 गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी 30 रुग्णांना कर्ण फाउंडेशन अंतर्गत उस्मानाबाद येथे मोतिबिंदू चे ऑपरेशन करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच वयोवृध्दाना काठीचे वाटप ही करण्यात आले. यावेळी कर्ण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक गुजर, विक्रमसिंह पाटील ,राहुल आडसुळ,प्रकाश फरताडे,बाबासाहेब लांडगे,बालाजी आडसुळ ,वैभव मिटकरी,जयजित जाधव, सतिश भातलवंडे, राजे आडसुळ,आबासाहेब गंभीरे ,विजय गंभीरे,बालाजी फरताडे, पवन सावंत,विकास गंभिरे, विश्व जित मोटे, रवि मोटे, निखील गंभीरे धनंजय मोरे,संतोश मोरे यांनी परीश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.