
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 23 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर व प्राचार्य डॉ सुनील पवार यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहीद स्मृती दिन साजरा करण्यात आला . यावेळी उपप्राचार्य प्रो. हेमंत भगवान, उपप्राचार्य प्रो सतीश लोमटे अंतर्गत गुणवत्ता कक्ष समितीचे समन्वयक डॉ. कमलाकर जाधव,प्रो,दादाराव गुंडरे, प्रा. ईश्वर राठोड, प्रा, राजीव कारकर , डॉ. दिपक सुर्यवंशी,डॉ. नागनाथ आदाटे, डॉ.आबासाहेब बोदंर,प्रो, ज्ञानेश चिंते,लेफ्टनंट.डॉ.के. डब्लू पावडे, प्रा,नंदकिशोर टेकाळे, डॉ. दत्ता साकोळे,प्रा, वाकडे,तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. नामानंद साठे, डॉ.संदीप महाजन व तसेच हनुमनत जाधव, अर्जुन वाघमारे, बालाजी डिकले, कमलाकर बंडगर, कालिदास सावंत मारुती केचे, आदित्य मडके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.