
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
शाळेतील विद्यार्थी साहित्य प्रकराशी भावनात्मक जोडले जावेत,नवीन लिहिण्याची उत्सुकता ,वाचण्याची उत्सुकता निर्माण व्हावी ,लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हावे याकरिता विषय शिक्षिका सौ ऊर्मिला अनिल तेली यांनी इयत्ता 6वी व 7वी मधील विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे.
विद्यार्थ्यासाठी कविता लेखनाविषयी मार्गदर्शन श्री.चंद्रकांत निकाडे (बालसाहित्यिक ,तसेच बालकुमार साहित्य सभा ,कोल्हापूर अध्यक्ष) . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ, ऊर्मिला अनिल तेली सांगितले.
घटना,विचार,परिस्थिती ,भावना या चार टप्प्यावर कवितेचे लेखन केले जाते.
यमक म्हणजे काय?ये कुठे?केव्हा? कसे?वापरावे,तसेच अनुप्रास अलंकार याचा कविता लेखनामध्ये उपयोग करावा.
मराठी साहित्यामध्ये सर्वात आधी कवितेचा जन्म झाला.त्यानंतर इतर साहित्य निर्मिती झाली.
विद्यार्थ्यांनी कविता लेखन करताना सुरुवातीला दोन ओळींची कविता,चार ओळींची कविता लिहिण्याचा सराव करावा.दोन अक्षरी ,चार अक्षरी यमक जुळणारे शब्द , सराव करावा.कविता प्रमाणबध्द असावी ,अल्पाक्षरी असावी, ओळीत शेवटी क्रियापद नसावे. अक्षरांचा लघु ,गुरू क्रम योग्य ठरवावा. मार्गदर्शना नंतर सांगितलेल्या भागावर प्रश्न विचारले,अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट दिली. आभार श्री.चौगले सरांनी मानले.
या उपक्रमासाठी डा. ए. ट. प्राचार्य श्री ,आय . सी.शेख ,अधिव्याख्याता सौ.अंजली रसाळ , गट शिक्षण अधिकारी श्री.शिवाजी मानकर ,केंद्रप्रमुख , श्री. आर. टी. बरगे.यांचे मार्गदर्शन मिळाले.मुख्याध्यापक श्री जयवंत चौगले,श्री शिंदे सर,श्री.पाटील सर,श्री. म्हाब्री सर, श्रीमती कलकुटकी मॅडम यांचे सहकार्य लाभले. वेतवडे गावचे सन्मानिय सरपंच ,उपसरपंच ,सदस्य , शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व सदस्य ,पालक यांचे सहकार्य लाभले.