
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
नांदेड येथील दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लिमिटेड नांदेड शाखा छत्रपती चौक येथे शाखा सल्लागार म्हणून श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे उपप्राचार्य श्री परशुराम लक्ष्मणराव येसलवाड यांची शाखा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. . श्री येसलवाड परशुराम लक्ष्मणराव यांची शाखा सल्लागारपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या सामाजिक , राजकीय व शैक्षणिक कार्यांचा सर्वत्र उदो उदो होत आहे. शिक्षक सेनेच्या माध्यमातून जिल्ह्याची जबाबदारी अतिशय चोखंदळपणे पार पाडत असताना त्यांनी शासनाकडे विविध बाबीचा पाठपुरावा करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा व लोकाभिमुख कार्य करण्याचा प्रयत्न सतत त्यांनी केला आहे एवढेच नव्हे तर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे अशा विविध अंगी गुण सामावलेल्या उपप्राचार्य श्री परशुराम येसलवाड यांची निवड दि. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लिमिटेड नांदेड शाखा छत्रपती चौक येथे शाखा सल्लागार म्हणून निवड करण्यात आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात केला जात आहे व पुढील वाटचालीस सर्वच स्तरातून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत….