
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:भारत राष्ट्र समिती युवा नेते
महाराष्ट्रातील युवकांना व शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील सभे मध्ये येण्यासाठी जाहिर आवाहन करण्यात आले. विजय पाटील हे तेलंगणा राज्य वेगळे करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के सी आर यांचे खंदे समर्थक म्हणून मदनुर मंडल मध्ये त्यांची ओळख आहे. विजय पाटील यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब व नवयुवक, शेतकरी यांना लोहा येथील पक्ष प्रवेशाच्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बी आर एस पार्टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विनंती केली. तेलंगाना राज्यातील जे गोरगरीब शेतकऱ्यांना जी योजना आहे ती योजना महाराष्ट्रात लागू करण्यासाठी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांचे हात मजबूत करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोहा येथील जाहीर सभेमध्ये येऊन के सी आर यांचे अमूल्य असे मार्गदर्शन घ्यावे अशी आव्हान विजय पाटील सोनाळकर यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे.