दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा:दि.२४/०३/२०२३ लातुर जहिराबाद महामार्गावरील निलंगा येथे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चार (४)जण ठार तर दोन(२)जण गंभीर झाल्याची हृदय हेलावून टाकणारी अत्यंत दुःखद घटना घडली असून अपघातातील सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी चाकूर जिल्हा लातुर येथून बसवकल्याण जिल्हा बिदर (कर्नाटकात) जात असताना सकाळी ११:३०ते १२:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघात पेठ ,आनंदनगर चाकूर जिल्हा लातुर येथील भगवान मोतीराम सावळे वय ५२ वर्षे ,लता भगवान सावळे वय ४५ वर्षे ,विजयमाला भाऊराव सावळे वय ५४ वर्षे,राजकुमार सुधाकर सावळे वय २९वर्षे अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर या अपघात महेश भगवान सावळे वय १९ वर्षे व शुभम सुनील सावळे वय ०६ वर्षे हे जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ पोलीस उपनिरीक्षक गर्जे व त्यांचे कर्मचारी व स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले.
घटनास्थळावरुन चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले.असून शवविच्छेदनासाठी निलंगा येथील शवगृहात ठेवण्यात आलेले आहेत.
दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सुरक्षिततेबाबत काही चिंता निर्माण झाल्या आहेत. तथापि, सरकारने रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे ,या रस्त्यावर पोलिसांची गस्त असणे गरजेचे आहे .
अपघाताच्या घटना घडतात हे वास्तव धक्कादायक आहे. दरम्यान, हा महामार्ग अनेक शहरे आणि खेड्यांमधून जातो, ज्यामुळे बाजारपेठ आणि इतर आर्थिक केंद्रांमध्ये प्रवेश होतो.
अशा महामार्गावर जेव्हा अपघाताच्या घटना घडतात तेव्हा सहाजिकच रस्ता सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर येतो
