
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई दि.
महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्य लॉटरीचा निकाल हा विक्री झालेल्या तिकीटामधुनच म्हणजे ‘हमीपात्र ‘काढण्यात यावा. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक बसुन लॉटरीची विक्री विक्रमी होऊ शकेल अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास सातार्डेकर यांनी गुढीपाडवा भव्यतम सोडतीच्या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
५३ वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेल्या राज्य लॉटरीच्या गुढीपाडवा भव्यतम सोडतीचा सोहळा नवी मुंबईतील लॉटरी कार्यालयात कमलाकर बडगुजर उपसंचालक राज्य लॉटरी तथा अवर सचिव वित्त विभाग यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी शिला यादव राज्य लॉटरी अधिकारी वित्त विभाग, सं. तु. ओहाळ उपसंचालक (वि व ले) राज्य लॉटरी वअधिकारी वर्ग उपस्थित होते. हमीपात्र निकाल नसल्याने प्रथम बक्षीस हे विक्री न झालेल्या तिकिटात निघाले या पार्श्वभूमीवर बोलताना लॉटरी विक्रेत्यांचे नेते सातार्डेकर म्हणाले बदलत्या स्पर्धेच्या काळात हमीपात्र बक्षीस ही काळाची गरज आहे. वर्षभरात राज्य लॉटरीच्या सहा भव्यतम सोडती निघतात आता येत्या १मे महाराष्ट्र दिनी होणार्या लॉटरी सोडतीला विक्री झालेल्या तिकीटामधुनच बक्षिस काढण्यात यावे अन्यथा याचा नकारात्मक परिणाम हा विक्रेत्यांवर पर्यायाने लॉटरी विक्रीवर होईल! धोरणात्मक बदलाची आता आवश्यकता आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेने गुढीपाडवा सोडतीची विक्री सर्वाधिक व्हावी यासाठी पाच लॉटरी तिकिटांवर एक बक्षिस सोडत ही योजना जाहीर केली होती. विजेत्या लॉटरी ग्राहकांना संघटनेनी जाहीर केलेली बक्षिसे ही देण्यात येणार आहेत तरी विजेत्यांनी संबंधित लॉटरी केंद्रावर किंवा संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. सोडतीच्या सोहळ्यास संघटनेचे सरचिटणीस राजेश बोरकर,उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा व ईतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.