
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
घुग्घुस
घुग्घूस : – आज शहरातील सुभाष नगर येथील सुभाषचंद्र बोस बाल उद्यानात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास प्रियदर्शनी कन्या विद्याल्यात शिकणाऱ्या विद्यार्थीनी चांदनी ठाकूर वय जवळपास 11 वर्ष,लक्ष्मी गंगाधरे व प्रांजली रामटेके शाळा सुटल्यावर बगिच्यात खेळत असतांना शेड पडला यात चांदनी ठाकूर ही गंभीर जखमी झाली असता तिला काँग्रेस नेत्यांनी राजीव रतन दवाखान्यात दाखल केले.
शहरात एका आठवड्यात बगीच्यांचे शेड पडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी तिलक नगर, शिव नगर येथील अटल बिहारी वाजपेयी बगीच्यांचे शेड पडले आहे.
वारंवार बगीच्यांचे शेड पडत असून नागरिकांचे व चिमुकल्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 01 चे अभियंता व कंत्राटदार एम.एस. भांडारकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार आसिफ राजा शेख यांना काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदनातून केली.
बगीच्यांच्या निर्माण कार्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले
बांबूच्या पिल्लरवर लोखंडी अँगल व त्यावर जड असा छत टाकल्यानेच या घटना घडल्या आहेत या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर कारवाईची मागणी ही काँग्रेस पक्षाने केली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी,अनुप भंडारी,सुनील पाटील,देव भंडारी,कपील गोगला,रफिक शेख,सन्नी कुम्मरवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते