
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-शहरातील रविंद्र प्राथमिक विद्या मंदिरची विद्यार्थीनी राजलक्ष्मी आबासाहेब बोराडे हिने आयटीएस परीक्षेत २७४ गुण मिळवून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, शाळेचे मुख्याध्यापक जी. एच. टेळे, एल. एस. देशमुख, उपमुख्याध्यापक शर्मिला पाटील, तसेच पत्रकार बांधव यांनी कौतुक केले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.