दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:-किरण गजभारे…
ज्या चार मजबूत स्तंभावर लोकशाहीचा डोलारा उभा आहे त्यापैकी वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे.
लोकशाही शासन प्रणालीत देशाचा कारभार पाहणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यप्रणालीवर एक तटस्थ अंकुश असणे गरजेचे असते. आणि हे अंकुश बजावण्याची प्रमुख भूमिका ही वृत्तपत्रांनाच पार पाडावी लागते. त्यासोबतच जनप्रबोधन आणि मार्गदर्शकाचे कर्तव्य देखील असतातच! त्याअर्थी वृत्तपत्र हा समाज हिताच्या दृष्टीने अत्यंत जबाबदार आणि तितकाच आवश्यक घटक आहे. अलीकडच्या काळापर्यंत वृत्तपत्रांनी ही जबाबदारी चोखपणे पार पडली असली तरी आज घडीला पत्रकारितेला धंद्याचे स्वरूप आल्याचे दिसते. त्यामुळे वृत्तपत्राच्या एकूण विश्वासहर्तेवरच प्रश्नचिन्ह लागत आहे. त्यामुळे लोकशाही टिकवायचे असेल तर वृत्तपत्रांनी आपली भूमिका निर्भीडपणे व चोखपणे बजावावी असे सडेतोड प्रतिपादन लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य कमलाकर कणसे यांनी केले.
कमलाकर कणसे यांनी नूतन प्राचार्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या परीने महाविद्यालयासाठी स्तुत्य उपक्रम चालू केले आहेत. प्राचार्य कणसे यांनी अगोदर एक चांगले पत्रकार म्हणून ओळख निर्माण केलेली होती. त्यामुळे पत्रकारांच्या भावना जपण्यासाठी त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला. तद्वतच महाविद्यालयाचा परिसराची साफसफाईची मोहीम व बागेत आसन व्यवस्था असा त्रिवेणी कार्यक्रम आयोजित केला.
तेव्हा प्राचार्य कणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणले की ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले. आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट ठेवला ,
उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉक्टर कमल किशोर काकांनी
सहसचिव वर्णी नागभूषण,कोषाध्यक्ष महेंद्र कुमार पांडे, संचालक उमेश झंवर, नागनाथ नोमूलवार, विश्वस्त रामकिशनजी चिंतावार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे, उप प्राचार्य डॉ. योगेश जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वसुंधरा पोहरे, यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होते.
यावेळी संस्थेच्या वतीने धर्माबाद येथील पत्रकारांना डायरी पेन व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.प्रभाकर जाधव लिखित दोन पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी धर्माबाद शहरातील बहुतांशी पत्रकार उपस्थित होते. व असा कार्यक्रम महाविद्यालयांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनीलचंद्र सोनकांबळे आणि डॉ. बालाजी श्रीगिरे तर आभार प्रा.डॉ. प्रतिभा येरेकर यांनी मानले.
