दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
मुंबई अश्वमेध यज्ञाच्या यशस्वी आयोजन करीता आज मुंबई गायत्री परिवार अश्वमेध यज्ञ प्रभारी मनुभाई पटेल आणी सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , व चंद्रपुर मनपा माजी नगरसेवक सुभाषभाऊ कांसनगोट्टूवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या सहयाद्री मलबार हील मुंबई येथे शासकीय उच्चस्तरीय शासकीय विशेष बैठक पार पडली.
या बैठकीला सिडको मुख्य अभियंता डॉ. गोडबोले , सांस्कृतिक मंत्रालयाचे मुख्य सचीव विकास खारगे ,सिडको जनसंपर्क अधिकारी प्रशांत भांगरे आणी संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने सहभागी होते.
या महत्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली
सिडको ची जमीन कार्यक्रमाच्या तीन महीने आधीच गायत्री परिवार कडे हस्तांतरित करून एक पत्र सिडकोच्या माध्यमातुन 10 दिवसांत गायत्री परिवार कडे देऊन पाणी पुरवठ्यासाठी संबंधित जो काही खर्च होईल तो भार आयोजकांना द्यावे लागेल तो खर्च अल्प स्वरूपाचा असेल.
अश्वमेध यज्ञस्थळी 4 जून ला भूमिपूजन कार्यक्रम होणार असुन प्रणव पंड्या व चिन्मयानंद या गायत्री परिवारातील पदाधिकाऱ्यांसह राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपनाताई मुनगंटीवार यांचे शुभहस्ते हस्ते विधिवत वैदीक व शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवरांची विषेश अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत
अश्वमेध यज्ञाचे वेळी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातुन विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन केल्या जाणार आहे. अश्वमेध यज्ञासाठी महाराष्ट्र भर सर्वत्र शोभायात्रा काढल्या जाईल. या करीता भव्य स्वरूपात चंद्रपुर जिल्ह्यात तयारी केल्या जाईल.
मुंबई मधील गायत्री चेतना केंद्राच्या सिडको बाबत काही आर्थिक अडचणी आहेत त्यावर मार्ग काढल्या जाईल.
सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या आयोजनासंदर्भात मुंबई च्या OSD व इतर अधिका-यांना तसेच आपल्या स्विय सहाय्यकांना काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मुंबई गायत्री परिवारातील वरिष्ठ त्यांच्या सतत संपर्कात राहून मदत करतील
महाराष्ट्रात होत असलेल्या या पुण्यकार्यात मी संरक्षक रूपात राहुन सर्व प्रकारची मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहिल असे अभिवचन महाराष्ट्राचे वने मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री व चंद्रपुर, गोंदिया जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती अध्यात्मिक आघाडीचे प्रा.डा.शैलेन्द्रकुमार शुक्ला यांनी दिली आहे.
आज झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ,नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेसह उपस्थित अधिका-यांचे गायत्री परिवारातर्फे मंत्र दुपट्टा देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी मनुभाई पटेल, प्रा.डा. शैलेंद्रकुमार शुक्ल, चंद्रपूर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार , उपेंद्र चौबे,
डॉ राजेंद्र त्रिपाठी,डॉ. राजेश चौबे, प्रह्लाद पांचाल, प्रबोध व्यास , वी .एन. मित्तल, श्रीमती पल्लवी देसाई, डॉ वरुण मानेक, उमेश जोशी, पी.डी. यादव आदींची उपस्थिती होती.
