दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालूक्यातील माळेगाव येथे प. पू. राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या तीन दिवशीय गीता रामायण सत्संगा चे आयोजन युवा नेते इंजि माधव चव्हाण व गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आले जागतीक बंजारा दिवस व हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर प.पू. आनंद चैतन्यजी महाराज यांच्या गीता रामायण सत्संगाला 6 एप्रिल पासून सुरुवात झाली असून गुरुवार (ता.6) रोजी निघालेल्या शोभायात्रेत भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. केहाळ वडगाव फाटा येथून माळेगावकडे निघालेल्या शोभायात्रेत माळेगाव सह पंचक्रोशीतील भावीकांनी विविध कार्यक्रम , पारंपरिक बंजारा वेशभूषेतील पथकासह मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये भाविक मंडळीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथामध्ये स्वार प.पू. आनंद चैतन्यजी महाराज यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव झाला. ही शोभायात्रा माळेगातुन श्री हरिहर चैतन्य सेवा धाम कथास्थळी पोहोचली. घरा समोर रस्त्याने गावकऱ्यांनी सडा रांगोळ्या काढून परमपूज्य महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कथा स्थानी भव्य दिव्य स्वरूपाची तयारी करण्यात आली आहे.कथेस आरंभ तीन दिवशीय या सत्संगास माता भगणीची उपस्थिती नोंदणीय होती मातृशक्तीबद्दल बोलताना महाराज म्हणाले आदीशक्तीचे विराट दर्शन या संत्सगात झाले मातृशक्तीमुळेच आपले अस्तीत्व टिकून आहे.

मनुष्याने कष्ट करावे कष्टा शिवाय पर्याय नाही मग क्षेत्र कोणतेही असो राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे लागते फुकट काही मिळत नाही ज्याला मिळाले त्याचे मागच्या जन्माची पुण्याई
मनुष्याच्या जीवनात गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंतीचा उन्माद सुध्दा होता कामा नये मनुष्याने स्वःतच्या मर्यादा ओळखून राहीले पाहीजे तरच त्याची पथ राहत असते ज्याला मर्यादा ओळखून वावरता आले त्याला ज्ञानी समजावे.यावेळी यावेळी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया, किसनराव मोरे, डॉ. सुधाकर
जाधव, हरीभाऊ चव्हाण, डॉ. सोपान
चव्हाण, नारायण राठोड, अमोल राठोड,
नितीन राठोड,कथेचे यजमान इंजि. माधव गुलाबराव चव्हाण सेवकराम राठोड रघुनाथ राठोड, विनायक गोबरा राठोड, वैजिनाथ जाधव, विकास जाधव, राजूदास राठोड, विकास जाधव, राजू चव्हाण, सचिन राठोड, कुलदीप उर्फ पप्पू राठोड, करण राठोड, निलेश राठोड, संजय चव्हाण, टायगर चव्हाण, त्रिभुवन चव्हाण, राहुल चव्हाण, पंकज चव्हाण, गजानन गडधे, आकाश चव्हाण, आकाश राठोड, बाळू राठोड, अजय राठोड, सतीश पवार, प्रवीण पाठोड राज राठोड, किरण राठोड , संतोष राठोड, विजय राठोड,बंडू पवार, अमोल पवार, जितेश पवार यांनी परिश्रम घेतले. अविनाश राठोड, रोहित राठोड,समाधान राठोड, स्वप्नील राठोड, रवींद्र राठोड, विठ्ठल राठोड,
गुलाबराव आनंदा चव्हाण व पंढरीनाथ बाबा चव्हाण मोठ्या संख्येने गावातील व पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते होती.
