
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : काही दिवसांपासून मविआ आपण एकत्र असल्याचं दाखवत आहे. पण शरद पवारांची विधानं काँग्रेसच्या विरोधातलं आहे. मविआत तणाव निर्माण झाल्याची शक्यता – संभाजीनगरमध्ये नाना पटोले अनुपस्थित – उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जोरदार चर्चा, त्यांचं नेतृत्व?
पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतले तीनही पक्ष आपण एकत्र असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण शरद पवारांची गेल्या काही दिवसांतली विधानं पाहता हे तिन्ही पक्ष एकमेकांपासून कुठेतरी दुरावत असल्याची चिन्हं आहेत. यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या सभेमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची अनुपस्थिती याच तणावाचे संकेत देत आहे. तसंच या सभेत उद्धव ठाकरेंचं झालेलं जोरदार स्वागत, आतषबाजी यामुळेही इतर पक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार हे तर नक्की आहे. आता या चर्चेचा विषय काय असेल? या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडणार आहे का? हे प्रश्न गुलदस्त्यात आहेत.