
दैनिक चालु वार्ता ता.मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
रोजगार हमी योजनेची बातमी प्रकाशित केल्याने बा-हाळीचे पत्रकार अजित पवार यांना धमकी देणाया व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी गिरी व मुखेड तहसिलदार पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 12 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली. यावेळी पेशकार गुलाब शेख यांचीही उपस्थिती होती.
तालुक्यातील भवानीतांडा येथील रहिवाशी असलेले अजित शंकरराव पवार हे दैनिक पुढारी या वर्तमानपत्रासाठी बा-हाळी येथून काम करतात. दि. 10 एप्रिल 2023 रोजी रोजगार हमी योजनेत अनियमितता – पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कामही निकृष्ट ; हिरानगर ग्राम पंचायतमध्ये घडलेला प्रकार या आशयाची बातमी तक्रारदार रमेश जाधव यांच्या लेखी तक्रारीवरुन प्रसिध्द केली.
हिरानगर येथील राहुल बाबुराव राठोड या व्यक्तीने पवार यांना व्हॉटसअप कॉल करुन तु इतलाच का भ्रष्टाचार काढालास, तुला दुसरीकडे नाही का ? येथून पुढे तु बातमी लावून बघ तुला मी पाहतो असा धमकीवजा इशारा दिला. तसेस पवार यांच्या फेसबुक अकॉऊंट वर बातमी अपलोड केलो असता त्यांनी पत्रकाराविषयी अपमानजनक अशी भाषा वापरली व विविध बाबी लिहिल्या व व्हॉटसअप वर तु काय आमदार, खासदार आहेस का असे राठोड म्हणाले.
पत्रकारांना अशा धमक्या येणे म्हणजे लोकशाहीस मारक आहे. पत्रकारांनी बातम्या लिहाव्यात किंंवा नाही हा सुध्दा सध्या राज्यात प्रश्न निर्माण झाला आहे. सदर व्यक्तीसपासुन मला व माझ्या कुटुंबियाच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्रकारास धमकावणाया व्यक्तीवर कडक कारवाई करावी अन्यथा सर्व पत्रकार बांधव जनआंदोलन करतील असे यावेळी निवेदनात नमुद करण्यात आले.
यावेळी अजित पवार यांच्यासह पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील, अॅड संदिप कामशेट्टे, विजय बनसोडे, अॅड. आशिष कुलकर्णी, ज्ञाने·ार डोईजड, दत्तात्रय कांबळे, रामदास पाटील,रियाज शेख, महेताब शेख, भास्कर तपवार, नामदेव श्रीमंगले,संजय कांबळे, जैनोदीन पटेल, असद बल्की,शिवकुमार बिरादार यांची उपस्थिती होती.