
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
शासकीय विश्रामगृहापासून रथामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर अॅड.अविनाश धायगुडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.या मिरवणुकीमध्ये फेटे बांधून मुले , तरुण , राजकीय पुढारी , मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे ,तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मा नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन राठोड,शिवसेनातालुका प्रमुख उदय बोराडे , बालासाहेब घनवट , प्रकाश घुले , मनोहर विरकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश घनवट , आकाश राऊत , योगेश घनवट , अशोक घनवट , संभाजी बनकर , विकास घनवट , रवी विरकर , आकाश घनवट, रवी विरकर , सोपान घनवट , सुधाकर शिंदे , शिवशंकर विधाते , विष्णू घनवट , विक्रम घनवट यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आस्मान शिंदे व बलभीम राऊत यांच्या पथकाकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.