दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- गुढी पाढवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांची गोड व आनंददायी होण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने ‘आनंदाचा शिधा’ अर्थात शंभर रुपयात चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने पोखरभोसी ता.लोहा येथील स्वस्थ धान्य दुकानदार श्री गोविंद माणिकराव पाटील ताटे यांच्या हस्ते धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा किट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जनसामान्य
नागरीकांचा गुढीपाढवा गोड झाला नाही पण भिमजयंती ही गोड व आनंददायी होणार आहे. शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चनादाळ, एक किलो साखर
व एक लीटर पामतेल उपलब्ध
झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पोखरभोसी ता.लोहा या गावात आनंदाचा शिधा किट वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे लाभार्थ्यांची भीमजयंती गोड होणार आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी स्वस्थ धान्य दुकानदार श्री गोविंद माणिका ताटे , पत्रकार विठ्ठल पाटील ताटे,व शिधा पत्रीका धारक उपस्थित होते व त्या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
