दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा: क्रांतीविर लहूजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्यध्यक्ष गोविंद सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १२ रोजी निलंगा शहरातील विश्रामगृह येथे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी मैनूदिन शेख यांची तर निलंगा शहर कार्यध्ययक्षपदी तुकाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख पाहूने रामलिंग पटसाळगे,जिल्हा सल्लागार दत्ता काळे,मराठवाडा नेते अजय कांबळे,घोरपडे सर उमाकांत शिंदे,प्रेम शिंदे,लखन बारतोंडे,राम सुरवसे,विश्वजित नावाडे,धीरज गु-हाळे,बब्रूवान सोळूंके,दिंगबर शिंदे संतोष मठपती नबीसाब मासूलदार,खदिर मासूलदार,हजीमलंग राठोडा,मेहबुब हाजी,प्रताप मोहिते,हजी सौदागर,नदीम सौदागर अदि पदाधिकारी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीचे सर्व समाज बांधव व लहूजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिका-यांनी स्वागत केले आहे.
