दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- शहरातील दर्यापूर रोडवरील टाकरखेडा नाका येथे नगररचना विभागाच्या वतीने आज दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.सदर अतिक्रमण कारवाई नगररचना अभियंता विठ्ठल घोंगे व बांधकाम अभियंता दिनेश ठेलकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेने आज अतिक्रमण आढावा मोहीम हाती घेतली आहे.येथील टपऱ्या हात गाड्या पक्के अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.उलट कारवाईच्या भीतीपोटी आणि त्यांनी आपले अतिक्रमण स्वतःच काढून घेतली आहे.दरम्यान अतिक्रमण धारकांचा फारसा विरोध झाला नाही.रस्त्यावरील टपऱ्या,पत्र्याची शेड,पायऱ्या अतिक्रमण करून व्यवसायिकांनी उभे केले असता जेसीबी द्वारे नगररचना अभियंता व बांधकाम अभियंता यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सदर अतिक्रमण हटाव मोहीमची कारवाई केली.
