दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती : डॉ.बाबासाहेब हे आजच्या सामान्य माणसाला कळले का हा आजचा एक मुख्य प्रश्न आहे मला असे वाटते,कारण आपण इंग्रज सरकार पासून स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्षे झाली,आपण आज शरीराने कोणाचे कैदी नाही.पण हे कैदीचे जीवन कोणामुळे संपले व आज आपण कोणामुळे स्वतंत्र जगतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे.आपण जे काही नागरिक भारतात राहतात ,त्यांना वैयक्तिक स्वतंत्र हे डॉ.बाबासाहेबामुळे मिळाले हे किती नागरिकाना माहिती आहे,हे शोधने फार आवश्यक आहे.कारण आपल्याला हे स्वतंत्र भारतीय संविधानामुळे मिळाले हे नागरिकाना अजून सुद्धा माहित नाही,कारण त्याच्या पर्यंत ते सांगण्याचे धाडस किंवा प्रयत्न कोणी केले नाही किंवा ते या प्रयत्नात यश मिळू शकले नाही.
आज डॉ.बाबासाहेब घराघरात पोहचणे फार या आवश्यक आहे,कारण डॉ.बाबासाहेब काय आहे,ते काय करू शकले असते व त्यांनी काय केले ही माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे.आज डॉ.बाबासाहेब हे विशिष्ट जातीत व धर्मात बांधले गेले आहे,असे मला वाटते,आणि हे चुकीचे आहे कारण डॉ.बाबासाहेबानी कोण्या एका जाती धर्मासाठी काहीच केले नाही त्यांनी सर्वच भारतीयासाठी सारखाच न्याय केला असे मला वाटते.त्यानी एका विशिष्ट चौकटीत बांधणे हे फार चुकीचे ठरेल.
डॉ.बाबासाहेब यांनी जेव्हा भारतीय संविधान लिहिले तेव्हा सर्वच गोष्टींचा विचार करून कलम लिहिल्या आणि भारतीय संविधानाची सुरुवात डॉ.बाबासाहेब यांनी याप्रकारे केली की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम यामध्ये सर्वांचं ओळख ही आम्ही भारतीय आहो अशी सांगितली आहे .यात कोणत्याच जाती धर्माचा उल्लेख केला नाही ही एक महत्त्वाची बाब आहे .आणि भारतीय संविधानामुळे सर्वांना समान हक्क दिला आहे.डॉ.बाबासाहेब यांनी श्रीमंताला दोन वेळा मतदानाचा अधिकार दिला असता पण त्यानी गरीब व श्रीमंत यांना एक वेळा मतदानाचा अधिकार दिला. त्यानी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही.डॉ.बाबासाहेबानी महिलासाठी फार महत्त्वाची तरतूद करून ठेवल्या आहे.महिला या तरतुदीचा फायदा घेतला पण तो फायदा कोणामुळे मिळाला हे त्यांना माहीत नाही.महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीत समान अधिकार दिला.ज्या महिला सरकारी नोकरी करतात त्याना गरोदर पणी फुल पगारी रजा मिळते ते डॉ.बाबासाहेबामूळे,डॉ.बाबासाहेब यांनी हिंदू कोड बिल जेव्हा मंत्रिमंडळात मांडले तेव्हा त्याला विरोध झाला,विरोध करणारे कोण होते हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे.हिंदू कोड बिलाला विरोध झाला म्हणून डॉ.बाबासाहेब यांनी मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला .तरी सुद्धा हिंदू म्हणतात आम्हाला काय दिले?
डॉ.बाबासाहेब याच एक वाक्य आहे की मी प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय आहो. ओळख दाखवताना मी एक भारतीय आहे हे त्यांनी सांगितले आहे.डॉ.बाबासाहेब हे भारतातील एकमेव नागरिक आहे त्यानी स्वतः च्या घरी एक वाचनालय सुद्धा सुरू केले त्या घराचे नाव “इ काळातील सर्वात मोठे खाजगी वाचनालय होय.व्यक्तीनी स्वता:च्या घराला वाचनालय करून सामान्य नागरिकांसाठी सुरू केले ती व्यक्ती स्वता:साठी कधीही विचार करत नाही हे कटू सत्य आहे.
डॉ.बाबासाहेब याच एक वाक्य आहे की मी प्रथम भारतीय व अंतिमतः भारतीय आहो.ओळख दाखवताना मी एक भारतीय आहे हे त्यांनी सांगितले आहे.डॉ.बाबासाहेब हे भारतातील एकमेव नागरिक आहे त्यानी स्वतः च्या घरी एक वाचनालय सुद्धा सुरू केले त्या घराचे नाव “इ काळातील सर्वात मोठे खाजगी वाचनालय होय.व्यक्तीनी स्वता:च्या घराला वाचनालय करून सामान्य नागरिकांसाठी सुरू केले ती व्यक्ती स्वता:साठी कधीही विचार करत नाही हे कटू सत्य आहे. डॉ.बाबासाहेब यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी जेव्हा आरक्षण दिले तेंव्हा सर्वप्रथम आरक्षण हे ओ.बी.सी. वर्गाला दिले कलम क्रमांक तीनशे चाळीस नुसार नंतर कलम क्रमांक तीनशे एकेचाळीस नुसार एस.सी.व तीनशे बेचाळीस नुसार एस.टी.याना आरक्षण दिले त्यांनी स्वता:च्या जातील नंतर पण ओ.बी.सी.वर्गाला अगोदर आरक्षण दिले.तरी सुद्धा ओ.बी.सी. नागरिक म्हणतात की डॉ.बाबासाहेब यांनी आम्हाला काय दिले?मी सांगूइच्छितो की आम्हाला काय दिले? हा प्रश्न विचारन्याचा अधिकार हा डॉ.बाबासाहेब यांनी दिला.हे किती नागरिकाना माहिती आहे.जर तुमच्या सोबत जर कोणी गैरव्यवहार केला तर तुम्हाला लगेच कोर्टात जाता येते, या कोर्टात येण्याचा अधिकार हा डॉ.बाबासाहेब यांनी दिला.
डॉ.बाबासाहेब यांनी संपूर्ण जीवन सामन्य जनतेसाठी अर्पण केले.पण डॉ.बाबासाहेब हे भारतीय नागरिकाना समजले नाही हि खूप खेदाची बाब आहे.पण विदेशात मात्र डॉ.बाबासाहेब हे एक रिअल हिरो म्हणून त्याची छवी ही भारत देशाची शान वाढवत आहे.डॉ.बाबासाहेब याचे एक इंग्लंड मध्ये सुद्धा एक घर आहे.डॉ.बाबासाहेब आणि मराठा समाजाचे नाते हे खूप घट आहे.कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा हा मराठा नेते भाई माधवराव बघाल यांनी बसवला व तेंव्हा डॉ.बाबासाहेब हे जिवंत होते.डॉ.पंजाबराव देशमुख हे जेव्हा डॉ.बाबासाहेब याच्या कडे संविधाना मध्ये काही मागण्याची नोंद व्हावी म्हणूनहगेले असता तेंव्हा मागणी डॉ.बाबासाहेब यांनी अगोदर संविधानात नोंद केली होती हे पाहून डॉ.पंजाबराव देशमुख यांचे डोळे भरून आले.डॉ.बाबासाहेब व डॉ.पंजाबराव देशमुख यांचे मैत्रीचे नाते तर होतेच त्याच बरोबर वैचारिक नाते सुद्धा होते. डॉ.बाबासाहेब हे नेहमी सांगायचे की मिभी घडलो तुम्ही भी घडा,तसेच ते सांगत होते की शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.पण तसे झाले नाही आम्ही शिकलो पण संघटिन नाही झालो आणि संघटित नाही झालो तर संघर्ष करण्याचा प्रश्नच येत नाही.ही आजची वस्तूस्थिती आहे.डॉ.बाबासाहेब यांनी शिक्षण क्षेत्रात जास्त महत्त्व दिले आहे त्यानी महाविद्यालयात सुरू केले काही सोसायटी सुरू केल्या.डॉ.बाबासाहेब याचे एक वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जे घेणार ते वाघासारखे गुरगुरणार हे वाक्य मात्र खरे आहे.कारण आज ज्यांना माहिती आहे ती व्यक्ती आवाज उठवल्या शिवाय राहत नाहीत बाकी सर्व फक्त पाहतात मात्र पाहणाऱ्यांना जागे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे,आणि नवीन क्रांती घडवून आणायची आहे.हीच या महामानवास जयंतीनिमित्त खरी मानवंदना ठरेल.
विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा…
वैभव वंदनाताई ज्ञानेश्वरराव काळे
रा.जालनापूर
मो.8600294102
