दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव .
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्था सचिव तथा माजी आमदार , ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी भाई गुरुनाथराव माणिकराव कुरुडे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्रातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची संच मान्यता ही आधार व्हॅलिड , इन व्हॅलिड , अन प्रोसेस या जाचक प्रक्रियेच्या कचाट्यात अडकून बसलेली असल्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड होत नसल्या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची संच मान्यता रखडली असून कार्यरत असलेल्या शिक्षकावर संच मान्यतेच्या अटीमुळे विनावेतन काम करण्याची वेळ आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. .माजी आमदार तथा ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी व संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी मुख्यमंत्र्यास लिहिलेले पत्र ” महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे पत्राद्वारे लक्ष वेधून घेत असताना माजी आमदार गुरुनाथराव माणिकराव कुरुडे साहेब यांनी राज्यातील शासकीय व प्रशासकीय शाळातून संच मान्यतेचे काम अधिकारी करीत आहेत त्यासाठी विद्यार्थ्याच्या गणती बरोबरच त्यांचे आधार कार्ड पडताळून खात्री करण्यात येत असताना बऱ्याच घोटाळ्याचे प्रकार होत आहेत आधार जुळत नाहीत , मुलांच्या हाताच्या रेषा जुळत नाहीत म्हणून ती मुले कमी करून विद्यार्थी गणती होत आहे त्यामुळे शिक्षकांची संख्या कमी होण्याची दाट शंका आहे तसेच ते काम बरोबर करून घेण्यासाठी अधिकारी वर्ग आर्थिक व्यवहार करून प्रश्न सोडवत आहेत. . ग्रामीण भागातील भटक्या समाजातील अथवा आदिवासी मुलांच्याच आधार कार्डात असे प्रकार दिसून येत आहेत त्यासाठी आता नवीन आधार कार्ड काढण्याची पण स्वतंत्र सोय नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे किंवा अधिकारी लाच घेऊन असे प्रश्न सोडवत आहेत अशा गैरप्रकारामुळे विनाकारण त्रास होत आहे प्रत्यक्ष मुलगा किंवा मुलगी उपस्थित असल्यावर त्यांचे आधार कार्ड जुळत नसल्याचे कारण सांगून शाळेचे नुकसान केले जात आहे हा प्रकार बंद करून आधार कार्ड नव्याने करून घेण्याची सोय करणे तरी गरजेचे आहे याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर व त्यांचे अधिकारी यांनी योग्य तो विचार करून हा प्रश्न सोडवणे जरुरीचे आहे कारण ग्रामीण भागात नव्याने आधार कार्ड काढण्याची सोय नाही ती तरी करणे गरजेचे आहे. . तरी कृपया सदरील प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून मार्ग काढावा व तमाम महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील शाळातील शिक्षक कमी होण्याचे प्रकार थांबवावेत. ही विनंती खोटा प्रकारही टाळणे जरुरीचे आहे परंतु यात खोटा प्रकार होणे सोपे नाही याची दखल घ्यावी.. .अशा प्रकारचे लेखी पत्र महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव तथा माजी आमदार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी लिहिले असून या पत्राच्या प्रति मा.ना. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , मा. शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई , मा.शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सुद्धा पाठवले आहेत.
