
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी दैनिक चालू वार्ता पेपरचे मुख्य संपादक डी एस लोखंडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ व थंड पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले. दैनिक चालू वार्ता पेपरचे देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे यांनी पुढाकार घेऊन रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ व थंड बाटलीचे वाटप करण्यात आले त्यावेळी देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते महादव पाटील नरंगलकर, शिवराज चेडके प्रमोद मोरे गजानन टेकमाळे राजू कांबळे पत्रकार पटणे पत्रकार अमोल शिंदे पत्रकार वरखीडे पत्रकार गजलवार आधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून डी एस लोखंडे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.