
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये डेमॉक्रॅटिक पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तरुण व आक्रमक सर्वांच्या सुखदुःखात सामिल होणारा असा चेहरा तेजस भिसे यांची निवड करण्यात आली.
सदरील बैठक डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ध्येय धोरण आणि पार्टीची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत पसरविण्यासाठी तसेच समाजातील अन्याय-अत्याचार दूर करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, विविध घटकांतील समस्या प्रशासन दरबारी मांडून
न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्मातील तसेच वंचित घटकांना सोबत घेवून राज्याच्या कानाकोप-यात पाटींचा संदेश पोहचविण्यात येत आहे. गाव पातळी पासून तालुका ,जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात येत असून त्या अंतर्गत नांदेड जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये तरुण व आक्रमक, सर्वांच्या सुखदुःखात सामिल होऊन मदत करणारा , असाचेहरा असलेला उस्माननगर ता.कंधार येथील तेजस विजय भिसे यांची नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पार्टीचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी तेजस विजय भिसे यांना निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.नुतन जिल्हाध्यक्ष झालेले तेजस विजय भिसे यांच्या निवडीबद्दल बीड चे जिल्हाध्यक्ष सुभाष लुंके,बीडचे पश्चिम जिल्हाध्यक्ष अमोल शेळकर, युवा पँथरचे दक्षिण नांदेड प्रमुख सम्राट अशोक आढाव, शाहीर गौतम पवार, संदीप सोनकांबळे, गोपाळ वाघमारे यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.व अॅड नागनाथ भिसे,प्रा.अमोल वाघमारे,प्रा. कपिल वाघमारे,गंगाप्रसाद भिसे ,संदीप भिसे,सुनिल भिसे,सौरभ भिसे,मारोती वाघमारे,सचिन पेनुरकर, सोमनाथ कांबळे,शंकर प्रसाद भिसे ,योगेश भिसे,रवि भिसे,सुमित वंजारे,गजानन शेळके,कनय्या भिसे ,अंकुश कांबळे,माधव भिसे,आदिनी तेजस विजय भिसे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे तेजस भिसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील राजकीय व सामाजिक कारकिर्दीय यशस्वी होण्यासाठी वरिल सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.व गावकऱ्यांच्या वतिने ,मित्रपरिवार, व त्याच्या कुटुंबाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .