
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अंबड – ज्ञानेश्वर साळुंके
चेतना फाउंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी नंतर च्या हुशार विद्यार्थ्यांना दहावी नंतर शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले व या विद्यार्थ्या मच्छोदरी विद्यालय अंबड येथे इयत्ता दहावी इ तुकडी तील विद्यार्थीनी उत्तीर्ण होऊन त्यांची निवड करण्यात आली यामध्ये (1) संस्कार शिवाजी आरगडे 2)श्रेयश कृष्णा शेळके 3)अभिषेक ज्ञानेश्वर वरे या विद्यार्थ्यांचा मोफत दोन वर्ष कोचिंग क्लासेस तसेच निवासी व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून चेतना फाउंडेशन तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे या तीन विद्यार्थ्यांची व्यवस्था या चेतना फाउंडेशन संस्थेने केलेली आहे या तीन विद्यार्थ्यांना धनगर पिंपरी येथील जि. प्रा. शाळातील आहे व हे विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी धनगर पिंपरी या शाळेत शिक्षण घेतलेला असून अत्यंत गौरवशाली बाब आहे की आपल्या धनगर पिंपरी गाव चे व शाळेचे नाव या तीन विद्यार्थ्यांनी रोशन होईल असे जि प्रा शाळेचे शिक्षक रफिक शेख सर यांनी सांगितले व या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने व गावकरी चा वतीने सत्कार
करण्यात आला या वेळेस उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व शालेय समिती सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पदधिकारी उपस्थित होते या वेळ तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यातत आला