दैनिक चालु वार्ता माहूर प्रतिनिधी- विनोद भारती
श्रीक्षेत्र माहूरगड हे साडेतीनशे एक मुख्य शक्तिपीठ या ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगाना ,महाराष्ट्र यासह देशातून अनेक कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात . माहूरगड श्री रेणुका माते चरणी आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी नवस किंवा उपासना करतात. रेणुका माते चरणी दरवर्षी भरभरून दान द्रव्य स्वरूपात भेटवस्तू येत असतात. यातच पाध्ये पाटील कुटुंबीय चंदनसार विरार (पूर्व )ता.वसई जि. पालघर येथील रहिवासी असून दर वर्षी श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात.
त्यांची श्री रेणुका माता ही कुलदेवता आहे .दिनांक 02/ 04 /2023 या रोजी रेणूका मातेच्या अलंकारातील दैनंदिन वापरातील मंगळसूत्राकरिता 2000काचेचे काळे मणी रेणुका माते चरणी अर्पण करण्यात आले यावेळी रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
