
दैनिक चालु वार्ता राजगुरूनगर ता. खेड प्रतिनिधी-मयुरी वाघमारे.
========================
राजगुरूनगर :- ता. खेड, जि. पुणे.
राजगुरूनगर शहरातील खळबळ जनक घटना.
राजगुरूनगर शहरात जुन्या घराची भिंत कोसळून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरातील आझाद चौकातील ही घटना रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. शहरात नेहमी गजबजलेल्या आझाद चौकात मध्यवर्ती ठिकाणी ही भिंत अंगावर पडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची अतिशय खळबळ जनक व दुर्दैवी अशी घटना घडली आहे. जुन्या घराची वीट, माती, दगड अंगावर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मजूर अति गंभीर स्वरूपात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर त्याचा देखील मृत्यू झाला. पहिल्या मजुराचे नाव- विजय वाडेकर वय वर्ष-40 राहणार चांडोली ता. खेड तर दुसरा – सुनील पांचाळ वय वर्ष – 30 मुळं राहणार लातूर सध्या खेड, असे दुसऱ्याचे नाव. आझाद चौकातील 60 ते 70 वर्षा पूर्वीचे हे काम असून नवीन बांधकाम साठी घर मालकाने जुने घर पाडण्यासाठी ठेकेदारकडे दिले होते.सकाळ पासून हे दोन मंजूर घरातील लाकडी सांगडे काढायचं काम करत होते. दोन माजलीचे हे घर होते पहिला मजला हा दुपार परियंत काढला व दुपार नंतर खालचा मजल्याचे काम चालू केले. काम चालू असतानाच ती दोन मजली भिंत त्या मजुरांवर कोसळून ते दोघे मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडले गेले. ही घटना समजताच जवळच्या नेहरू चौकातील तरुणांनी तसेच स्थानिक लोकांनी घटनेस्थळी धाव घेतली. ढिगाऱ्या खाली गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला. एका मजुराला तात्काळ जेसीबी च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तरी स्थानिक लोकांनी प्रशासनाला व ठेकेदारला अशा कामासाठी मनुष्यबळाचा वापर न करता यंत्रनेचा वापर करावा अशी विनंती केली.