
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी/ अहमद्पूर- शिवकुमार हिप्परगे
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे व काँग्रेस नेते एकत्र आले आहेत. भाजपच्या नेत्यांचे मनोमिलन व डॉक्टर गणेश कदम यांच्या साथीने शेतकरी विकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे माननीय माजी राज्यमंत्री व मा. आमदार श्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची घोडदौड चालू आहे सर्वच नेते दिवस-रात्र एक करून मतदारसंघ पिंजून काढत आहे शेतकरी विकास पॅनलने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असल्याची दिसून येत आहे.
प्रशासक काळातील वेगवेगळी प्रकरणे काढून आमदार साहेबांच्या विकास कामावरील नाराजी व त्यांची घराणेशाही यामुळे शेतकरी विकास पॅनलला भरपूर प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर गणेश कदम हे अहमदपूर तालुक्यातील अभ्यासू हुशार आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात यांनीही महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणत्याही हालतीत झेंडा फडकवायचा असा चंग बांधला आहे डॉक्टर गणेश कदम यांची साथ शेतकरी विकास पॅनलला संजीवनी ठरणार आहे. ऊस शेतकऱ्यावरील होणारी पिळवणूक व अन्याय,शेतकऱ्यासाठी केलेले विमा आंदोलन हे घेऊन प्रचार करत आहेत.
माजी आमदार विनायकराव पाटील, दिलीपराव देशमुख, गणेश हाके, डॉ. गणेश कदम माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, अशोक केंद्रे, ऍड. भारत चामे, जीवनजी मद्देवार, गोविंद गिरी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक मंडळ ,ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत चे उप् सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना करत आहेत