दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मौजे हणेगाव या गावाचे नाव आवार्जून घेत असतात परंतू या
हणेगाव ते खुतमापूर, कोकलगाव,रमतापूर,येडूर, कुन्मारपल्ली,बिजलवाडी अशा एकाच रस्त्यावर असणाऱ्या गावांची अवस्था स्वातंत्रयाच्या अगोदरचे लोक जे जीवन जगत होते ते आजसुद्धा या भागातील लोक जगत आहेत.तीन राज्याच्या सिमेवर वसलेले हे गाव.या गावांना महाराष्ट्रतील गावापेक्षा कर्नाटकातील गावांना जास्त संपर्क साधता येतो व तेथील मार्केटचा लाभ जास्त घेता येत असल्यामुळे
हणेगाव ते बिजलवाडी या कामाला सुरुवात होऊन किमान तीन वर्ष झाले असून या कामाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने झाले असून गुत्तेदार व उपविभागीय अभियंता यांच्या संगनमताने या कामाची सुरुवात चालू झाली असल्याची चर्चा सुरू आहे.हणेगाव ते बिजलीवाडी या रस्त्यावर नविन पुल बांधण्यात आले असता पावसाळ्यातील पहिल्याच पाण्याने या पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे वाहून गेले असता याची पाहणी करण्यासाठी या कामावरील गुत्तेदार पैजने व उपविभागीय अभियंता शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता यांचे फोन बंद होते परंतू या कामाची दखल घेतली नाही.
दि 18 एप्रिल 2023 रोजी परत कामाची सुरुवात झाली असून डांबरीकरणाचे काम एकदम निकृष्ठ दर्जाचे झाले असून या कामाची दखल कोणीच घेत नाहीत व रस्त्यावर डांबर व गिट्टीचे प्रमाण आर्धा इंच सुद्धा नाही व हे रस्त्याचे काम फक्त दिखाव्यासाठी करीत असल्याची चर्चा या भागातील शेतकरी व बिजलवाडी येथील ग्रामस्थ करीत हणेगाव ते बिजलवाडी रस्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाविषयी विचारणा केली असता सहाय्यक अभियंता उडवा उडी ची भाषा करत असून गुत्तेदाराची बाजू घेत असल्याचे निदर्शनास आले.
