दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या शिवर ग्राम विविध सहकारी कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शिवर येथील स्व.मोतीराम रामलाल राठोड यांच्या पत्नी श्रीमती उर्मिला राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले असताना,शिवर गावातील सर्व सुज्ञ संचालकांनी एकत्र येऊन,स्वर्गीय मोतीलाल रामलाल राठोड यांच्या धर्मपत्नी श्रीमती उर्मिला मोतीलाल राठोड यांची शिवर सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली,शिवर ग्राम विविध सहकारी सोसायटीवर मागील अनेक वर्षापासून स्व.मोतीलाल रामलाल राठोड यांची एक हाती सत्ता असून,त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती उर्मिला राठोड यांची या सोसायटीवर बिनविरोध निवड करण्यात आली, श्रीमती उर्मिला मोतीलाल राठोड(अध्यक्ष)श्री.मारुती राहु तोडसाम (उपाध्यक्ष) जयराम राठोड, फुलसिंग जाधव, किसन राठोड, सविता मासाळ,रविराज नरोटे,दिलीप गुलदगड, उत्तम रहाटे,ओमकार वैद्य, राजेश नागपुरे, कृष्णराव रहाटे, दादाराव आडे,सह सर्व संचालक उपस्थित होते, निवडणूक अधिकारी म्हणून पि.ए.अवथरे स.सु.अ. अंतर्गत सहकारी संस्था आर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले,
———————————————-
मला जे आज अध्यक्षपद मिळाले हे माझे पते स्व.मोतीलाल रामलाल राठोड यांच्यामुळे मिळाले असून, शिवर ग्राम विविध सहकारी संस्थेच्या सर्व संचालकाचे मी मनापासून आभारी आहे
श्रीमती उर्मिला मोतीलाल राठोड
