दैनिक चालु वार्ता राजगुरूनगर ता. खेड प्रतिनिधी -मयुरी वाघमारे
========================
राजगुरूनगर :- भिवेगाव ता. खेड, जि. पुणे. मुलीला नांदायला घेऊन जा आस म्हणणाऱ्या वृद्ध सासऱ्याच्या डोक्यात जावयाने बांबू घालून जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना खेड तालुक्यातील भिवेगाव या ठिकाणी घडली असून यावराच न थांबता जावयाने घरातल्या लाईटच्या वायरी ओढून बल्प ही फोडले. तसेच घरावर चढून घराचे पत्रे फोडून घराचे ही नुकसान केले आहे. घरातील सर्वाना जीवे मारण्याची धमकी ही जावई चिमटे याने दिली आहे. यावर सासरे धुंधा दगडू वनघीरे वयवर्षे 70 यांनी खेड पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली आहे. जावई ज्ञानेश्वर लक्ष्मण चिमटे राहणार – गोरेगाव तालुका खेड, यांचा विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सासरे व कुटुंबातील बाकीची मंडळी घरात बसलेली असताना जावई ज्ञानेश्वर चिमटे हा अचानक घरी आला व पत्नी वैशालीस तू तुझ्या माहेरीच राहा मी फक्त मुलीला नेयाला आलो आहे. यावर बाकीचांनी ज्ञानेश्वर ह्यास दोघीना पण घेऊन जा आस सांगताच त्यांनी साऱ्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. व शिवीगाळ करून पत्नी वैशाली हिस लाथाबुक्यांनी माराण्यास सुरुवात केली. बांबूचा काठीने घरातील लाईटचे बल्प फोडले. घरात आरडाओरडा झाल्याने जवळपासचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी जावई ज्ञानेश्वर चिमटे हा सर्वाना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थालावरून पळ काढला. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे पुढील गोष्टीचा अधिक तपास करत आहेत.
