
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी –
मंठा तालुक्यातील माळेगाव- केहाळवडगाव सोसायटीच्या चेअरमन पदी सुरेश दवणे यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याबद्दल दर्पण मराठी पत्रकार संघाचे सहसचिव व नवनिर्वाचित चेअरमन युवा पत्रकार सुरेश दवणे यांची मंठा येथील विश्रामगृहावर दर्पण मराठी पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी दर्पण मराठी पत्रकार संघाचे मुख्य सल्लागार बाबासाहेब कुलकर्णी, मार्गदर्शक प्रदीप देशमुख, अध्यक्ष दर्पण मराठी पत्रकार संघ अनिल.बा खंदारे, उपाध्यक्ष रविंद्र भावसार, सचिव मंजुषाताई काळे,कोषाध्यक्ष अतुल खरात, सदस्य अश्फाक शेख आदींनी नवनिर्वाचित चेअरमन सुरेश दवणे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल सुरेश दवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.