
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा शहरात आझाद ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न झाली.
लोहा शहरात आझाद ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत लोहा शहरातील मुस्लिम समाज बांधवांसाठी पवित्र रमजान निमित्त आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे मार्गदर्शनाखाली आझाद ग्रुप चे ल़ोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी आझाद ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत सहभाग नोंदविला.
यावेळी आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रूद्रा पाटील भोस्कर, अकबर कुरेशी, युनुस शेख,गौस शेख,रफिक शेख,महमंद कुरेशी,मेहुनन कुरेशी,शेरखाॅ पठाण, शादुल शेख, नयुम शेख,अरनास पठाण, अरशद कुरेशी, अकबर कुरेशी, सरदार पठाण, मेहबुब कुरेशी, यांच्या सह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.