
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे :आज दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी विमाननगर ते हिंजवडी व विमाननगर ते हडपसर अशी बस सेवा सुरू झाली आहे. बरेच दिवस विमाननगर मधील नागरिक आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते फुलचंद म्हस्के ह्यांच्या कडे बस सुरू होण्याकरिता अनेकदा मागणी करत होते.
🚍 आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अनेक दिवस यासाठी PMPML चे सीएमडी श्री ओमप्रकाश बकोरिया व व्यवस्थापकीय संचालक श्री सतीश गव्हाणे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते. अखेर विमाननगर येथील नागरिकांसाठी तो आनंदाचा दिवस आज 19 एप्रिल 2023 रोजी आला आहे.
उद्घाटन समारंभ प्रसंगी आम आदमी पार्टीचे वडगावशेरी अध्यक्ष गणेश ढमाले, चेंथील अय्यर ( आप पी एम पी विभाग प्रमुख ), अनिल धुमाळ, मनोज फुलावरे, फैबियन आण्णा,अमित म्हस्के,किरण कांबळे, सीमा गुट्टे, संजय कटणावरे, अक्षय शिंदे, सुधाकर रुपटक्के , दिलीप साळवे, विष्णू मेटे , दयानंद सावंत, बाळासाहेब शिंगाडे , निखिल लोंढे, अनिल काकडे सर्व सहकारी विमाननगर म्हाडा कॉलनी शेवटचा बस स्टॉप येथे उपस्थित होते.