दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनीधी –
सांगोला गेल्या अनेक वर्षाचा बिनविरोधच इतिहास मोडीत निघाला असून सांगोला मार्केट कमिटीची निवडणुक लागणार आहे. सांगोल्यातील शेकाप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, आदीच्या नेतेमंडळींनी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी विविध पक्षाच्या नेतेमंडळी आणि पुढाऱ्यांनी बिनविरोधचा प्रयत्न करून सुद्धा वेळेत उमेदवारी अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक लागली.
निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यावर राजकिय दबाव आणून वेळेंतरही अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात होताच.RPI चे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख कमरुदिन खतीब यांनी वेळेत हस्तकक्षेप केल्यामुळे अनेक अर्ज राहिले आणि विविध पक्षाच्या नेतेमंडळीच्या बिनविरोधच्या स्वप्नावर पाणी फिरले.
